Pradeep Pendhare
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एका कार्यक्रमात देशातील राजकीय मुद्यांवर आपले मत मांडले.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना देशातील राजकारण आणि राजकारण्यांबद्दल काही प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी उत्तर दिले.
'आम्ही कोणत्याही पक्षाचे काम करत नसून, आम्ही देशातील हिंदूंसाठी नाही, तर 150 कोटी हिंदूंसाठी लढत आहोत', असे धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आम्ही राहुल गांधींसह लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव, मायावती, ममता बॅनर्जींवरही विश्वास असल्याचे म्हटले.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी या देशातील सर्व पक्ष आमचे आहेत. कारण आपण या देशाचे रहिवासी आहोत. आपण या देशात राहणार आहोत.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सत्तेत जो पक्ष येतो किंवा कोणताही पक्ष सत्तेतून जातो, याच्याशी आमचा काहीही संबंध नसतो.
आम्हाला आमच्या देशातील मुलींची काळजी आहे, की त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू नये, अशी अपेक्षा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी व्यक्त केली.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दिल्ली ते वृंदावनपर्यंत यात्रा काढणार आहोत. आम्हाला आंदोलन नाही, पण देशाचे आंदोलक व्हायचे आहे, असे म्हटले.