सरकारनामा ब्यूरो
राज्यातील अनेक नेत्यांनी आज (ता. 30) सर्वांना गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील शासकीय निवासस्थानी गुढीची पूजा आणि प्रार्थना करत हिंदू नववर्षाचे स्वागत केले.
रोहित पवार यांनी कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात नववर्षाची गुढी उभारुन पूजा केली.
गुढीपाडव्याच्या दिवसानिमित्त ठाणे शहरातील टेंभीनाका येथील आनंद आश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांरपरिक पद्धतीने पूजा करत गुढी उभारली.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारत सहकुटुंब गुढीची पूजा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी गुढी पाडव्यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारली. राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवासस्थानी सहकुंटुब गुढी उभारुन पूजा केली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुढीपाडव्यानिमित्ताने त्यांच्या पत्नीसह गुढी उभारुन राज्यातील लोकांना नववर्षच्या शुभेच्छा दिल्या.
जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांनी गुढी उभारत सहकुटुंब पूजा केली.
वरळीतील श्री साई भक्त मंडळामार्फत आयोजित वरळी ते शिर्डी पालखी सोहळ्यास उपस्थित राहून आदित्य ठाकरे यांनी साईंचे दर्शन घेतले. तसेच सर्वांना गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.