Rashmi Mane
आपल्या व्यक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे बागेश्वर बाबा सध्या पुण्याच्या तीनदिवसीय दौऱ्यावर आहेत.
बुधवारी (22 नोव्हेंबर ) धीरेंद्र शास्त्री यांनी देहू येथे जाऊन संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले.
या वेळी मोठ्या प्रमाणात भक्तांनी गर्दी केली होती.
बागेश्वर बाबा यांच्या सोबत भाजप नेते जगदीश मुळीक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या आक्षेपार्ह वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी या वेळी केला.
पुण्यात जगदीश मुळीक फाउंडेशनकडून बागेश्वर धाम महाराज यांचा कार्यक्रम 20 ते 22 नोव्हेंबर रोजी हनुमान सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.