Jagdish Patil
23 जानेवारी 1926 रोजी बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला. सत्तेत नसतानाही सत्तेची दिशा ठरवणारं त्यांचं व्यक्तिमत्व होतं.
बाळासाहेब हे नऊ भावंडांमध्ये सर्वांत मोठे होते. त्यांचे वडील केशव ठाकरे हे सामाजिक कार्यकर्ते तसंच मराठी राज्याच्या मागणीच्या आंदोलनांमध्ये सक्रिय होते.
त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना वडिलांकडूनच प्रेरणा मिळाली. सुरूवातीला कला त्यानंतर पत्रकारिता आणि मग ते राजकारणी बनले.
1960 च्या दशकात त्यांनी आपल्या भावासोबत मराठी साप्ताहिक मार्मिक सुरू केले. यातून त्यांनी मराठी माणसाचे प्रश्न, परप्रांतीयांविरोधातील भूमिका आक्रमपणे मांडली.
19 जून 1966 रोजी याच मराठी माणसांच्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत शिवसेना या संघटनेची स्थापना केली.
त्यांच्या कडवड हिंदुत्वादी भूमिकांमुळे त्यांना 'हिंदूहृदयसम्राट' असं म्हटलं जाऊ लागलं. 1990 च्या दशकात त्यांनी शिवसेना सत्तेत येताच बॉम्बेचे नाव मुंबई केले.
1992 मध्ये बाबरी मशिद पाडल्यानंतर 'जर ती शिवसैनिकांनी पाडली असेल तर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे,' असं वक्तव्य केलं होतं.
आणीबाणीच्या काळात विरोधात असूनही त्यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता.
2002 मधील हिंदूंनी आत्मघाती पथके तयार केली पाहिजेत, या वक्तव्यांमुळे आयोगाने त्यांच्यावर मतदानासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी 6 वर्षांची बंदी घातली.
1995 मध्ये भाजपसोबत युती करून शिवसेना सत्तेत आली. तर 2006 शिवसेना पक्षाची धुरा उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात आली.
त्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. हा बाळासाहेबांना मोठा धक्का होता.
अशा या तडफदार नेत्याचं 17 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबईत निधन झालं. त्यांच्या अंत दर्शनासाठी मुबंईत "न भूतो न भविष्यति' अशी गर्दी उसळळी होती.