Rashmi Mane
राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे.
दोन वेळा राज्यमंत्री आणि चार वेळा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत संवेदनशील व मितभाषी नेतृत्व.
वडील दिवंगत भाऊसाहेब थोरात काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. बाळासाहेबांना लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले.
बाळासाहेब थोरात यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1953 रोजी नगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील जोरवे या गावी झाला.
संगमनेरला माध्यमिक आणि उच्च शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांनी काही दिवस संगमनेरच्या कोर्टात वकिलीची प्रॅक्टिसही केली.
बाळासाहेब थोरात यांचे खरे नाव विजय थोरात असे आहे. मात्र, घरात चार मुलीनंतर जन्मलेल्या बाळासाहेबांना लाडाने ‘बाळ’ म्हटले जायचे, म्हणून पुढे त्यांचे नाव ‘बाळ’चे बाळासाहेब झाले.
बाळासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जोरवे दूध सोसायटीचे 1983 ला चेअरमन झाले. त्याच वेळी ते संगमनेर सहकारी दूध संघाचे संचालकही बनले.
बाळासाहेब थोरात यांनी 1990, 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 या विधानसभेच्या निवडणुका लढल्या आणि जिंकल्या.