Balasaheb Thorat : सलग आठ निवडणुका जिंकणारे नेते : बाळासाहेब थोरात

Vijaykumar Dudhale

जोरवे येथे जन्म

बाळासाहेब थोरात यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1953 रोजी नगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील जोरवे या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. पुढे संगमनेरला माध्यमिक आणि उच्च शिक्षण पुण्यात झाले. फग्युर्सन महाविद्यालयात त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांनी काही दिवस संगमनेरच्या कोर्टात वकिलीची प्रॅक्टीसही केली.

Balasaheb Thorat | Sarkarnama

'विजय'चे झाले बाळासाहेब...

बाळासाहेब थोरात यांचे नाव हे विजय असे आहे. मात्र, घरात चार मुलीनंतर जन्मलेल्या बाळासाहेबांना लाडाने ‘बाळ’ म्हटले जायचे, त्यातून ते पुढे ‘बाळ’चे बाळासाहेब झाले. ते 1983 च्या दरम्यान जोरवे दूध सोसायटीचे चेअरमन झाले आणि त्यांच्या राजकीय इनिंगला सुरुवात झाली. त्याच वेळी ते संगमनेर सहकारी दूध संघाचे संचालकही बनले.

Balasaheb Thorat | Sarkarnama

अपक्ष म्हणून लढली पहिली निवडणूक

बाळासाहेब यांचे वडिल भाऊसाहेब थोरात हे आमदार होते मात्र, भाऊसाहेबांना 1985 मध्ये काँग्रेसकडून तिकिट नाकारण्यात आले. त्यावेळी भाऊसाहेबांनी निवडणूक न लढवता काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांना अपक्ष म्हणून उभे केलं. ती त्यांची पहिली विधानसभेची निवडणूक होती. भाऊसाहेबांना ही भूमिका मान्य नव्हती. त्यामुळे ते मुलाच्या प्रचारालाही गेले नव्हते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांना कोंडून ठेवले होते. 1985 मध्ये बाळासाहेब हे अपक्ष म्हणून निवडून आले होते.

Balasaheb Thorat | Sarkarnama

दुसऱ्याच दिवशी काँग्रेसला पाठिंबा

संगमनेरमधून 1985 मध्ये बाळासाहेब थोरात हे अपक्ष म्हणून निवडून आले. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी काँग्रेस पक्षाला न मागता पाठिंबा देऊन टाकला आणि ते काँग्रेसवासी झाले. पुढे त्यांनी भंडारदरा धरणाचे 30 टक्के पाणी अकोले आणि संमनेरला मिळावे, यासाठी मोठा लढा उभारला आणि त्यांनी ती मागणी पूर्ण करून घेतली.

Balasaheb Thorat | Sarkarnama

1999 मध्ये मिळाले पहिल्यांदा मंत्रिपद

बाळासाहेब थोरात यांनी 1990, 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 या विधानसभेच्या निवडणुका लढल्या आणि जिंकल्या. म्हणजेच बाळासाहेब थोरातांनी सलग आठ निवडणुका जिंकल्या. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये 1999 मध्ये थोरात हे पहिल्यांदा पाटबंधारे राज्यमंत्री झाले. त्यानंतर 2004 मध्ये कॅबिनेट मंत्री झाले त्यांच्या कृषी मंत्रालय देण्यात आले होते. पुढे ते 2010 मध्ये महसूल मंत्री झाले.

Balasaheb Thorat | Sarkarnama

राहुल गांधींचा संगमनेरला मुक्काम

काँग्रेस पक्ष अडचणीत असताना बाळासाहेब थोरात यांनी 2019 मध्ये काँग्रेसची राज्याची कमान सांभाळली. ते प्रदेशाध्यक्ष झाले. शरद पवार यांच्यासोबत समन्वय साधत त्यांनी काँग्रेसच्या 44 जागा निवडून आणल्या होत्या. दरम्यान,त्याचवेळी राहुल गांधी यांनी थोरात यांच्या संगमनेर येथील घरी 24 एप्रिल 2019 रोजी मुक्काम केला होता. गांधींचा तो संगमनेर दौरा राज्यात गाजला होता.

Balasaheb Thorat | Sarkarnama

महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्वपूर्ण भूमिका

बाळासाहेब थोरात यांच्याकडे 2019 मध्ये प्रदेशाध्यक्ष, त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री, पक्षाचे विधीमंडळ नेते आणि केंद्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य होते.

Balasaheb Thorat | Sarkarnama

राष्ट्रवादी प्रवेश असा थांबला

बाळासाहेबांचे शरद पवारांशी कामय स्नेहाचे संबंध राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांनी पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भाऊसाहेबांनी विरोध केल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली नाही. थोरात परिवाराला येत्या 2030 मध्ये काँग्रेसमध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत.

Balasaheb Thorat | Sarkarnama
Amit Shah | Sarkarnama
NEXT : येथे क्लिक करा