Aslam Shanedivan
नेपाळमधील विविध सामाजिक प्रश्न आपल्या मैथिली भाषेतील 'रंप'मधून मांडणारे बालेंद्र ऊर्फ बालेन शाह यांना नेपाळच्या जनतेने सार्वत्रिक निवडणुकीत कौल दिला आहे.
अवघ्या ३५ वर्षाचे बालेन शाह यांच्याकडे 'जेन-झी'च्या आंदोलनानंतर नेपाळचा युथ मोठ्या आशेने पाहत असून त्यांनी येथील सरकारचे नेतृत्व करावे अशी मागणी होत आहे
बालेन शाह यांचा जन्म २७ एप्रिल १९९० ला काठमांडू येथील नारादेवी येथे झाला. त्यांनी काठमांडूचे महापौर पदावर काम केले. २०१३ मध्ये 'रॉ बार्झ' या 'रॅप बॅटल लीग'मधून प्रचंड प्रसिद्धी मिळवली.
बालेन मधेशी समाजाचे असून ते युवकांचे नेते म्हणून ओळख जातात. 'माता जानकीला प्रणाम,' असे म्हणत त्यांनी नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली होती.
नेपाळच्या राजकारणात वेगाने उदयास येत असलेले बालेंद्र शाह आगामी काळात नेपाळच्या पंतप्रधानपदासाठी संभाव्य दावेदार मानले जात आहेत.
विशेष म्हणजे, त्यांच्या शैक्षणिक प्रवासात कर्नाटक आणि विशेषतः बेळगावचा संबंध येतो. ते विश्वेश्वरण्या तांत्रिक विद्यापीठाशी जोडले गेले आहेत.
बालेन शाह यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नेपाळमध्ये पूर्ण केले. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी हिमालयन व्हाइट हाउस इंटरनॅशनल कॉलेज, काठमांडू येथे घेतली.
पुढे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये विशेष प्रावीण्य मिळविण्यासाठी ते भारतातील बंगळूर येथील एम. व्हीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात दाखल झाले
हे महाविद्यालय विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाशी संलग्न असून त्यांचे येथे एम.टेक.चे शिक्षण पूर्ण झाले.