Mangesh Mahale
प्रेरणा खवळे यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आहे.
शेतकऱ्याच्या लेकीने यूपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. देशात ९१३ रॅंक मिळवली आहे
मालेगावातील कळवाडी येथील शेतकरी कैलास खवळे व सुनिता खवळे यांची लेक आहे.
प्रेरणा यांचे प्राथमिक शिक्षण कॅम्प भागातील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या भारत विद्यालयात झाले.
नवोदय परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी खेडगाव ( ता. दिंडोरी) येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले.
पदवीच्या शिक्षणासाठी कोल्हापूर मधून बीएसस्सी ॲग्रिकल्चर पदवी संपादन केली.
तीनवेळा अपयश आले. पण जिद्द सोडली नाही, चौथ्यांदा यश मिळाले.
प्रेरणा ही मातंग समाजातील असून तिने मिळवलेले यश समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे