Rajanand More
नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालानंतर सत्तांतर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. डाव्यांचा सत्ती धुळीस मिळाली असून बालेन शाह यांच्या पक्षाने सत्ता काबीज केली आहे.
बालेन शाह हे नेपाळी युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. रॅपर म्हणून त्यांनी आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर काठमांडूचे महापौर आणि आता थेट पंतप्रधान बनणार आहे.
बालेन शाह यांची संपत्ती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. द वीक आणि बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, त्यांची संपत्ती नेपाळी रुपयांमध्ये केवळ ५ ते ६ कोटी रुपये एवढीच आहे. भारतीय रुपयांमध्ये हा ३.१ ते ३.८ कोटी रुपये एवढा होतो.
शाह यांना सध्या महापौरपदाचे महिना ४६ हजार नेपाळी रुपये वेतन मिळायचे. त्यांनी आता या पदाचा राजीनामा दिला आहे.
इंजिनिअरींग क्षेत्रातही त्यांनी करिअर केले असून बालेन कन्सल्टिंग अँड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. या व्यवसायातून २ लाख नेपाळी रुपये मासिक कमाई होते.
बालेन हे पत्नी आणि एका मुलासह काठमांडूतील गैरीगांव, टिंकुने भागात राहतात. त्यांचे घर लक्झरी नसून साधेच आहे. त्यामुळे तरुणांमध्ये त्यांची इमेज कोट्यधीश अशी नाही.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतची एकूण संपत्ती ३ कोटी रुपयांची जवळपास होती. निवडणूक शपथपत्रात त्यांनी संपत्तीबाबत माहिती दिली होती.
शाह यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाची स्थापना केली अन् पहिल्याच निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. मातब्बर नेत्यांच्या पक्षाला त्यांनी धूळ चारली आहे.