Rajanand More
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरूवारी (५ मार्च) राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे आता ते काही दिवसच मुख्यमंत्री असतील. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याविषयी ‘पलटू राम’ अशी चर्चा सुरू.
२०१३ मध्ये नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांना विरोध म्हणून एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
२०१७ मध्ये नितीश कुमार यांनी आधीचा आरजेडीसोबतचा घरोबा मोडून भाजपची साथ घेतली होती. पण २०२२ मध्ये त्यांनी पुन्हा आरजेडीसोबत जाणे पसंत केले.
नितीश कुमार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. पण अचानक पलटी मारत ते भाजपसोबत गेले होते.
नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण देशात त्यांच्या अनाकलनीय निर्णयांची चर्चा सुरू. ‘पलटू राम’ला उजाळा.
उतर प्रदेशातील बलरामपूर सदर मतदारसंघाच्या आमदाराचे नाव पलटू राम आहे. ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये राज्यमंत्रिही होते. त्यांची आमदारकीची ही दुसरी टर्म आहे.
नितीश कुमार यांच्याबाबत अनेकदा पलटूराम हा शब्द वापरण्यात आला आहे. त्या प्रत्येकवेळी पलटू राम हे सोशल मीडियात ट्रोल झाले आहेत.
पलटू राम यांचा उत्तर प्रदेशात वेल्डिंगचा व्यवसाय होता. बृज भूषण शरण सिंह हे त्यांचे राजकीय गुरू आहेत.