Pakhtunistan : बलुचिस्तानप्रमाणेच 'या' प्रांतालाही व्हायचंय पाकिस्तानपासून वेगळं, काय कारण?

Ganesh Sonawane

खैबर पख्तुनुन्ख्वा (केपी)

स्वातंत्र्यपूर्व भारतातील वायव्य सरहद्द प्रांत म्हणजेच सध्याच्या पाकिस्तानमधील खैबर पख्तुनुन्ख्वा (केपी) हा प्रांत. हा पाकिस्तान महत्त्वाचा प्रांत असून, येथेही बलुचिस्तानप्रमाणेच असंतोष धगधगत आहे.

Pakhtunistan | Sarkarnama

स्वतंत्र होण्याची मागणी जुनीच

पाकिस्तानमधून फुटून स्वतंत्र होण्याची येथील मागणी जुनीच आहे. स्वतंत्र पख्तुनिस्तानसाठी ही चळवळ सुरू आहे. त्यासाठी संघर्ष-हिंसाचार सातत्याने होत असतो.

Pakhtunistan | Sarkarnama

फाळणीनंतर पाकिस्तानचा भाग

१९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर खैबर पख्तुन्ख्वा पाकिस्तानचा भाग झाला.

Pakhtunistan | Sarkarnama

सार्वमतावर बहिस्कार

१९४७ मध्ये ब्रिटिशांनी वायव्य सरहद्द प्रांतात भारत किंवा पाकिस्तान यापैकी एक निवडण्यासाठी सार्वमत घेतले. पख्तून नेत्यांनी स्वतंत्रतेचा पर्याय नसल्यामुळे सार्वमतावर बहिस्कार टाकला होता.

Pakhtunistan | Sarkarnama

स्वतंत्र देशाची मागणी

त्यानंतर अनेक पख्तून नेत्यांनी 'पख्तूनिस्तान' या स्वतंत्र देशाची मागणी केली.

बाचा खान (डावीकडे) महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधींसोबत | Sarkarnama

सैनिकी कारवाया

या प्रांतात वेळोवेळी सैनिकी कारवाया, बंडखोर गटांशी संघर्ष आणि मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप झाले.

Pakhtunistan | Sarkarnama

पाकिस्तानच्या 'जीडीपी

पाकिस्तानच्या 'जीडीपी'मध्ये या प्रांताचे योगदान १० टक्के आहे आणि खाण उत्पादनात २० टक्के आहे.

Pakhtunistan | Sarkarnama

खैबर खिंड'

खैबर खिंड' हा भारत आणि मध्य आशियामधील प्राचीन व्यापारी मार्ग होता. याच मार्गान हूण, ग्रीक (अलेक्झांडर), शक, कुशाण आणि मुस्लिम आक्रमक भारतात आले. हे क्षेत्र प्राचीन गांधार देश अन् गांधार संस्कृती म्हणून प्रसिद्ध. तक्षशिला आणि पेशावर ही त्याकाळी बौद्ध शिक्षणाची केंद्रस्थाने होती.

Pakhtunistan | Sarkarnama

NEXT : संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी; सात खासदार ठरले मानकरी

Sansad Ratna Award 2025 | Sarkarnama
येथे क्लिक करा