सरकारनामा ब्यूरो
तुम्हाला माहीतीय का? बंगाल गॅझेट ' हे भारतातील पहिले वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते. 1780 मध्ये सुरू झालेले हे वृत्तपत्र कोलकाता येथून प्रकाशित झाले होते. त्यानंतर मराठी वृत्तपत्र सुरू होण्यास तब्बल 48 वर्ष वाट पाहावी लागली.
6 जानेवारी 1832 या दिवशी ‘दर्पण’ च्या रूपाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकर यांनी हे पत्र सुरू केले तर चला दर्पणकार आचार्य़ बाळशास्री जांभेकर यांच्याविषयी जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण होते. ते 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. हे वृत्तपत्र द्विभाषिक पाक्षिक होते आणि इंग्रजीत द बॉम्बे दर्पण म्हणून देखील प्रकाशित होत होते.
बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20 फेब्रुवारी, 1812 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोंभुर्ले या गावी झाला. आणि 17 मे, 1846 मुंबई येथे त्यांची प्राणज्योत मावळली. ते मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते.
6 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मर्णार्थ साजरा केला जातो. त्यांनी दर्पण या वृत्तपत्राचा वापर लोकांना सामाजिक सुधारणांसाठी जागृत करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून केला.
बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते. खुप लोकांचा संभ्रम आहे की 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असते, परंतू तसे नसून 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले होते. 18 फेब्रुवारी या दिवशी जयंती असते.
बॉम्बे दुर्पुण, दुर्पुण म्हणजेच दर्पण म्हणून ओळखले जाते, हे 1832 ते 1840 पर्यंत मुंबईत प्रकाशित होणारे द्विभाषिक वृत्तपत्र होते. त्याची स्थापना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केली होती.
दर्पण वृत्तपत्र हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित होत होते. एक स्तंभ मराठीमधून तर एक स्तंभ इंग्रजीतून असायचा. बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 पासून 26 जून 1840 पर्यंत म्हणजे जवळपास साडेआठ वर्षे 'दर्पण'चे संपादन केले. 26 जून 1840 रोजी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.