Dial 112 : पोलिसांची मदत अवघ्या काही मिनिटांत मिळेल; फक्त डायल करा 'तीन अंकी' नंबर

सरकारनामा ब्यूरो

डायल करा 112

आपल्याला पोलिसांची मदत हवी असेल तर आपण 100 नंबर डायल करतो. आता त्याच्या जोडीला आणखी एक 112 या एका हेल्पलाइनवरून सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. हा नंबर डायल करताच पोलिसांना नेमका फोन कोठून आला, हे समजणार आहे.

Dial 112, Police Emergency Helpline | Sarkarnama

सरासरी वेळ

पोलीस अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये तेथे पोहचणार आहेत. सध्या पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर पोलिसांची सरासरी वेळ 7 मिनिटांमध्ये घटनास्थळी मदत पोहोचते.

Dial 112, Police Emergency Helpline | Sarkarnama

कमी वेळेत मदत

पोलिसांना मोठ्या प्रमाणात वाहन उपलब्ध करून देण्यात आल्याने हा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पोलीस दल हायटेक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचा डायल 112 हा एक भाग आहे.

Dial 112, Police Emergency Helpline | Sarkarnama

कॉल कसा हाताळला जातो?

कॉल प्रथम नवी मुंबई नियंत्रण कक्षात केंद्रात जातो. त्यानंतर संबंधित जिल्हा व जवळच्या पोलीस मार्शलकडे माहिती पोहोचते. मग तात्काळ पुढील कार्यवाही केली जाते.

Dial 112, Police Emergency Helpline | Sarkarnama

पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन

कॉल नंतर पुढे GPS व जिओ-टॅगिंगद्वारे जवळचे पोलीस वाहन शोधले जाते आणि त्वरित घटनास्थळी पाठवले जाते. त्यामुळे नागरीकांना तात्काळ मदत मिळते.

Dial 112, Police Emergency Helpline | Sarkarnama

कॉल येताच कळणार लोकेशन

यापूर्वी पोलिसांना तक्रारदाराने 100 नंबर वर कॉल केला असता लोकेशन कळत नसे. आता डायल 112 प्रणालीवर कॉल केल्यास लगेच लोकेशन समजते. त्यामुळे तक्रारदार यांना तत्काळ मदत मिळत आहे.

Dial 112, Police Emergency Helpline

कॉल येताच...

कॉल येताच पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाइन, चाइल्ड हेल्पलाइन यांनाही या कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊ शकतील.

Dial 112, Police Emergency Helpline | Sarkarnama

NEXT : विमानांचा रंग पांढराच का असतो? 'ही' 5 मोठी कारणे जाणून घ्या

Airplane paint reasons | Sarkarnama
येथे क्लिक करा.