Rajanand More
बलुचिस्तानमध्ये मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या महिला कार्यकर्त्यांची मागील काही दिवसांपासून चर्चा होत आहे. या कार्यकर्त्यांमधील महत्वाचे नाव होते करिमा बलोच.
करीमा बलोच या बलुचिस्तानमधील मानवी हक्क कार्यकर्त्या होत्या. पाकिस्तान सरकारविरोधात बलोचमधील नागरिकांच्या मुलभूत हक्कांसाठी त्या लढत होत्या.
बलुच स्टुड्ट्स ऑर्गनायझेशन (बीएसओ-आझाद) या राजकीय विद्यार्थी संघटनेच्या त्या पहिल्या अध्यक्षा होत्या.
करीमा यांचे 2020 मध्ये अपहरण झाले. त्यानंतर काही दिवसांत त्यांचा मृतदेह स्वीडनमधील एका नदीत आढळून आला. त्यावेळी त्यांचे वय अवघे 37 वर्षे होते.
पाकिस्तानी लष्कराच्या नागरिकांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला कार्यकर्त्या म्हणून त्या बलुचमध्ये प्रसिध्द होत्या.
पाकिस्तान सरकारने त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांनी कॅनडामध्ये आश्रय घेतला होता.
बलुची जनतेचा हुंकार म्हणून त्यांची ओळख होती. अत्यंत धाडसाने त्या हक्कांसाठी लढत राहिल्या. पण त्यांच्या संशयास्पद मृत्यूनेही मोठे वादळ उठले.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दिल्याने करीमा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनला राखी पाठवली होती.