Aslam Shanedivan
शिवाजी विद्यापीठाचा 61 वा दीक्षान्त समारंभ नुकताच पार पडला.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, डॉ. आशिष लेले, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज ही उपस्थित होते
यावेळी बंडू राजू कोळी याला राष्ट्रपती सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले
तर क्रिशा अल्दा नोरोन्हा यांना कुलपती सुवर्ण पदकांने गौरविण्यात आले
बंडू राजू कोळी आणि क्रिशा अल्दा नोरोन्हा यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
या दीक्षान्त समारंभात 38 जणांना एचडी आणि 40 पारितोषिके देण्यात आली
या दीक्षान्त समारंभासाठी 14 हजार 269 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष हजेरी लावली होती. तर ऑनलाईन पद्धतीने देखील 2000 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.