Rajanand More
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांंची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता.
आरक्षणाच्या मुद्यावरून उसळलेल्या हिंसाचारानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पलायन केले आहे. त्या भारतात आहेत.
शेख हसीना आणि खालिदा जिया या कट्टर राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे खालिदा जिया यांच्या सुटकेला महत्व प्राप्त झाले आहे.
माजी राष्ट्रपती जियाउर रेहमान हे पती. त्यांच्या निधनानंतर खालिदा जिया राजकारणात सक्रीय झाल्या. 1991 नंतर बांगलादेश राष्ट्रवादी पक्षाची धुरा हाती घेतली.
बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान. १९९१ आणि नंतर २०११ मध्ये घेतली पंतप्रधानपदाची शपथ.
भ्रष्टाचारप्रकरणी खालिदा जिया यांच्यासह दोन मुलांना 17 वर्षांची शिक्षा. 2018 पासून होत्या नजरकैदेत. शेख हसीना पळून गेल्यानंतर राष्ट्रपतींच्या आदेशाने सुटका.
खालिदा जिया या चीन व पाकिस्तान समर्थक नेत्या मानल्या जातात. कट्टरपंथी नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
खालिदा जिया यांच्या हाती बांगलादेशची सत्ता गेल्यास भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील राजकीय घडामोडींकडे भारताचे लक्ष.