Jagdish Patil
माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा कट्टर विरोधक शरीफ उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेशात हिंसाचार उफाळला आहे.
या हत्ये प्रकरणी बांगलादेश सरकारने फैसल करीम मसूदला मुख्य आरोपी म्हणून घोषित केलंय.
पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी करत त्याला परदेश प्रवासावर बंदी घातली आहे.
बांगलादेशातीस हिंसाचाराला मसूदच कारणीभूत असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
तर बांगलादेशातील हिंसाचाराला कारणीभूत असलेला मसूद नेमका कोण आहे? ते जाणून घेऊया.
विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादीची हत्या फैसल करीम मसूदने केल्याचा संशय आहे. मसूद हा छात्र लीग या संघटनेचा माजी नेता आहे.
बांगलादेशात त्याच्या संघटनेवर सध्या बंदी घालण्यात आली असून माजी पंतप्रधान हसीना यांच्या अवामी लीग पक्षाची ही विद्यार्थी संघटना आहे.
त्याने 2013 मध्ये मसूदने ढाका येथील एका खाजगी विद्यापीठातून संगणकीय विज्ञान शाखेची पदवी पूर्ण केली होती.
त्यानंतर खासगी विद्यापीठातून MBA ची पदवी मिळवली. बांगलादेशमध्ये 2024 मध्ये झालेल्या जनआंदोलनादरम्यान तो अवामी लीगच्या नेत्यांबरोबर होता.
मसूदला यापूर्वी ढाका येथील शाळेत झालेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.