Jagdish Patil
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर 26 डिसेंबर 2025 पासून तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.
कारण भारतीय रेल्वेने मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर या दरवाढीचा परिणाम होणार आहे.
नव्या रचनेनुसार 'ऑर्डिनरी क्लास'मध्ये 215 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी कोणतीही भाडे वाढ करण्यात आलेली नाही.
मात्र 215 किलोमीटरच्या पुढील प्रवासासाठी ऑर्डिनरी क्लासमध्ये 1 पैसा प्रति किलोमीटर अशी भाडे वाढ करण्यात आली आहे.
तर मेल/एक्सप्रेसच्या नॉन-एसी व एसी क्लाससाठी 2 पैसे प्रति किमी भाडेवाढ लागू केली जाणार आहे.
या दरवाढीतून भारतीय रेल्वेला चालू आर्थिक वर्षात ६०० कोटींचा महसूल मिळणार आहे.
नव्या तिकीट दरानुसार जो प्रवासी 500 किमीचा प्रवास नॉन-AC डब्यातून करत असेल, तर त्याला आताच्या तिकीट दरापेक्षा जास्तीचे 10 रुपये द्यावे लागतील.
आश्चर्याची बाब म्हणजे भारतीय रेल्वेने या वर्षात दुसऱ्यांदा तिकीट दरात वाढ केली आहे. याआधी 1 जुलै रोजी रेल्वेने भाडे वाढ केली होती.
या आधीच्या दरवाढीतही मेल आणि एक्स्प्रेससाठी 1 पैसा तर एसीसाठी 2 पैसे प्रति किलोमीटर अशीच भाडे वाढ करण्यात आली होती.