Pradeep Pendhare
'हैदराबाद गॅझेटियर'नुसार आरक्षण मिळावे यासाठी जालना अन् बीड जिल्ह्यात 'बंजारा' समाजानं आक्रोश मोर्चा काढला.
वंजारा-बंजारा एक आहे, NCP आमदार धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.
वंजारी अन् बंजारा नावांमध्ये साम्य असले तरी, दोन्ही समाजात मोठा फरक आहे.
बंजारा समाज हा मुख्यत्वे लमाण किंवा गोर बंजारा म्हणून ओळखला जातो, एकेकाळी व्यापारी जमात होती आणि सैन्याला रसद पुरवायचे.
बंजारा समाजाची लाम्बडी ही मुख्य भाषा असून, काही राज्यांमध्ये अनुसूचित जाती (SC) म्हणून, तर महाराष्ट्रात ते विमुक्त जमातींमध्ये (VJ) येतात.
आता 'हैदराबाद गॅझेटियर'नुसार आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी बंजारा समाजाची आहे.
राजस्थानमधून दक्षिणेकडे स्थलांतरित झालेल्या क्षत्रिय जाती जमातींपैकी ही एक जात आहे.
महाराष्ट्रात ते भटक्या जमाती-ड (NT-D) या श्रेणीत मोडतात. त्यांची सांस्कृतिक परंपरा, वेशभूषा आणि बोलीभाषा बंजारा समाजापेक्षा वेगळी आहे.
दोन्ही समाजांचे सामाजिक वर्गीकरण भिन्न आहे; बंजारा समाज विमुक्त जमातींमध्ये (VJ) तर वंजारी समाज भटक्या जमाती-ड (NT-D) मध्ये मोडतो.