Rashmi Mane
तुमचं बँक अकाऊंट फसवणुकीपासून वाचवण्यासाठी या चुका करू नका! पाळा हे महत्त्वाचे नियम.
"1234" किंवा "abcd" सारखे सहज ओळखता येणारे पासवर्ड वापरू नका.
मजबूत पासवर्ड ठेवा ज्यामध्ये अक्षरे, संख्या, विशेष चिन्हांचा समावेश असेल.
कोणतीही अज्ञात व्यक्तीचा किंवा बँकेचा कर्मचारी असं सांगत कॉल आला तरी त्याला OTP शेअर करू नका. OTP म्हणजे तुमच्या खात्याची किल्ली आहे हे लक्षात ठेवा.
कोणत्याही अनोळखी ईमेल, मेसेजमधील लिंकवर क्लिक करणे टाळा, बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरूनच लॉगिन करा.
रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, मॉल अशा पब्लिक ठिकाणावरील मोफत Wi-Fi सुरक्षित असेलच असे नाही त्यामुळे, आर्थिक व्यवहार करताना नेहमी सुरक्षित नेटवर्क वापरा.
बँक व्यवहार झाल्यावर नेहमी लॉगआउट करा.
नवीन सुरक्षा फीचर्स मिळवण्यासाठी अॅप अपडेट करा.
“आपलं ATM कार्ड बंद होणार आहे” अशा कॉल्सना उत्तर देऊ नका. शंका आली की बँकेच्या हेल्पलाईनवर संपर्क करा.