Aslam Shanedivan
1 एप्रिल 2025 पासून देशात नवे बँक नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यात विविध गोष्टींचा समावेश आहे
यामुळे आता क्रेडिट कार्ड, बचत खाते, एटीएममधून पैसे काढण्यावर त्याचा परिणाम होणार आहे.
नव्या बँक नियमानुसार दरमहा मोफत एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत घट करण्यात आली असून शुल्कात बदल झाले आहेत. आता इतर एटीएममधून तीन पेक्षा जास्त वेळ पैसे काढल्यास प्रति व्यवहार 20 ते 25 शुल्क लागणार आहे
बँकांनी त्यांच्या किमान बॅलेन्स नियमात बदल केले आहेत. फक्त ते शहरी, अर्ध-शहरी किंवा ग्रामीण या निकशांवर अवलंबून आहे.
पॉझिटिव्ह पे सिस्टमनुसार आता किमान 5000 हजार रक्कम खात्यावर ठेवावे लागणार आहे
डिजिटल बँकिंग वाढवण्यासाठी अॅडव्हान्स ऑनलाइन फिचर्स आणि एआय-संचालित चॅटबॉट्सची सुविधा देण्यात आली आहे.
बचत खाते आणि मुदत ठेवींच्या नियमातही बदल करण्यात आले असून व्याजदरांमध्ये सुधारणा झाली आहे.
एसबीआय आणि आयडीएफसी फर्स्ट बँकसह इतर प्रमुख बँकांनी क्रेडिट कार्डमध्ये बदल केले आहेत. व्हाउचर, नूतनीकरण आणि माइलस्टोन रिवॉर्ड्स बंद करण्यात आले आहेत.