IAS Pawan Yadav : अमित शहांच्या दिमतीला मणिपूरमधील IAS अधिकारी; थेट खासगी सचिव केलं...

Rajanand More

पवन यादव

पवन यादव हे 2014 च्या तुकडीचे मणिपूर केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Pawan Yadav | Sarkarnama

अमित शाह

शहांचे खासगी सचिव ही खूप मोठी जबाबदारी आहे. एकीकडे मणिपूरमधील हिंसाचारावरून मोदी सरकारवर टीका होत असताना याच राज्यातील अधिकारी शहांच्या दिमतीला नियुक्त करण्यात आला आहे.

Amit Shah | Sarkarnama

उप सचिव

पवन यादव हे केंद्रीय गृह मंत्रालयातच सध्या उप सचिव म्हणून काम पाहत होते. शहांच्या खासगी सचिवांची इतर विभागात बदली झाल्याने यादव यांना बढती मिळाली. ता. 2 एप्रिल 2027 पर्यंत ते या पदावर कार्यरत असतील.

Home Ministry | Sarkarnama

मणिपूरमध्ये जन्म

यादव यांचा जन्म 1988 मध्ये मणिपूरमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. मणिपूर विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे.

IAS Pawan Yadav | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात यश

पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पवन यांनी UPSC ची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात 2014 मध्ये त्यांना यश मिळाले आणि ते IAS बनले.

IAS Pawan Yadav | Sarkarnama

प्रभावी काम

पहिली नियुक्ती चुराचंदपुरमध्ये सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्याठिकाणी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करत स्थानिक नागरिकांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही मन जिंकले.

IAS Pawan Yadav | Sarkarnama

कलाटणी

विष्णूपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना पवन यादव डिजिटायझेशन, खेलो इंडिया या केंद्र सरकारच्या उपक्रमांमध्ये केलेल्या कामाचे खूप कौतुक झाले. इथेच त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली.

IAS Pawan Yadav | Sarkarnama

पंतप्रधान पुरस्कार

विष्णूपूर जिल्ह्यात केलेल्या कामाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली. त्यांना 2022 चा पंतप्रधान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर त्यांची दिल्लीत बढती मिळाली.

IAS Pawan Yadav | Sarkarnama

NEXT : राजकीय नेत्यांना घाम फोडणाऱ्या 'ईडी'च्या माजी प्रमुखांना मोदींनी दिली मोठी जबाबदारी

येथे क्लिक करा.