Jagdish Patil
नोकरदार असो, शेतकरी असो वा व्यापारी सर्वांनाच बँकेशी संबंधित कामे करावी लागतात.
मात्र, अनेकदा बँकेशी संबंधित कामे करताना विविध शॉर्टफॉर्म वापरले जातात. त्यांचा नेमका अर्थ काय असतो ते जाणून घेऊया.
RBI हा भारतीय रिजर्व बँकेचा शॉर्टफॉर्म आहे. या बँकेच्या हातात देशाची आर्थिक घडी आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ही एक भारतीय सरकारी बँक आहे.
ऑनलाईन व्यवहार करताना अनेकदा IFSC कोड विचारला जातो. IFSC म्हणजे भारतीय वित्तीय प्रणाली कोड जो बँक ग्राहकांसाठी महत्वाचा असतो.
NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर ज्याचा वापर एका बँकेतील पैसे दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करताना केला जातो.
RTGS म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, ही एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम आहे.
मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन (MICR) कोड जो चेकच्या तळाशी छापलेला 9-अंकी कोड असतो. जो चेक क्लिअरिंग आणि सॉर्टिंगची प्रक्रिया सोपी करण्यास मदत करतो.