Jagdish Patil
वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट (VSI) संस्थेला देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वापराची (विनियोग) चौकशी करण्यात येणार आहे.
यासाठी राज्य सरकारने साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
VSI ला 2009 पासून अनुदान दिले जात असले, तरी ही चौकशी कधीपासून कधीपर्यंत करावी हे ठरलेलं नाही. शिवाय चौकशी अहवाल राज्य सरकारला कधीपर्यंत द्यायचा याचीही स्पष्टता नाही.
मात्र, ही चौकशी नसून केवळ पैशांची माहिती घेतली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
तर राज्य सरकारच्या चौकशी करण्याच्या निर्णयानंतर व्हीएसआय चर्चेत आली असून सध्या या संस्थेत कोण कोण नेते आहेत ते जाणून घेऊया.
वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आहेत.
त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत.
अजित पवारांसह माजी मंत्री, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजयसिंह मोहिते-पाटील, बाळासाहेब पाटील, दिलीप वळसे-पाटील.
जयप्रकाश दांडेगावकर, खासदार विशाल पाटील हे नेते देखील नियामक मंडळाचे सदस्य आहेत.