बँक व्यवहार करताय? फॉलो करा 5 सोप्या टिप्स; तुमचे पैसे राहतील 100% सुरक्षित!

Rashmi Mane

बँक व्यवहार करताय?

बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या 5 महत्त्वाच्या टिप्स तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यास मदत करतील.

AI Generated Photo | Sarkarnama uses AI-generated photos

KYC वेळेवर अपडेट करा

आधार, पॅन आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक नेहमी अद्ययावत ठेवा. KYC पूर्ण नसल्यास खात्यावर मर्यादा येऊ शकतात. खाते सक्रिय ठेवण्यासाठी अधूनमधून व्यवहार करत राहा.

Bank account safety tips for customers | Sarkarnama uses AI-generated photos

बॅलन्स आणि शुल्क जाणून घ्या

तुमच्या खात्यासाठी आवश्यक किमान शिल्लक किती आहे, हे तपासा. बॅलन्स कमी असल्यास दंड लागू शकतो. एटीएम, एसएमएस आणि चेकबुकवरील शुल्काची माहितीही घ्या.

Bank account safety tips for customers | Sarkarnama uses AI-generated photos

ठेवींचे विमा संरक्षण

बँकेला आर्थिक अडचण आल्यास ठेवींवर ठराविक मर्यादेपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध असते. त्यामुळे मोठी रक्कम ठेवताना या नियमांची माहिती ठेवणे महत्त्वाचे आहे.

Bank account safety tips for customers | Sarkarnama uses AI-generated photos

नॉमिनीची नोंद करा

बँक खात्यात वारसदाराचे नाव नक्की जोडा. भविष्यात कोणतीही अडचण आल्यास कुटुंबीयांना पैसे मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी होते.

Bank account safety tips for customers | Sarkarnama uses AI-generated photos

OTP कोणालाही सांगू नका

बँक कधीही फोन, मेसेज किंवा ईमेलवरून OTP, PIN किंवा पासवर्ड विचारत नाही. अशी माहिती कोणासोबतही शेअर करू नका.

Bank account safety tips for customers | Sarkarnama uses AI-generated photos

सायबर फसवणुकीपासून सावध

अनोळखी लिंक, QR कोड किंवा संशयास्पद ॲप्सपासून दूर राहा. खात्यातील प्रत्येक व्यवहाराचा मेसेज तपासत राहा आणि संशयास्पद हालचाल दिसताच त्वरित बँकेशी संपर्क साधा.

Bank account safety tips for customers | Sarkarnama uses AI-generated photos

सुरक्षित बँकिंगची गुरुकिल्ली

थोडी जागरूकता आणि योग्य खबरदारी घेतल्यास आर्थिक नुकसान टाळता येते. या 5 सवयींची सवय लावा आणि तुमचे बँक खाते अधिक सुरक्षित ठेवा.

Bank account safety tips for customers | Sarkarnama uses AI-generated photos

Next : शिक्षकांनो, E-KYC न केल्यास दोन महिन्याचा पगार अडकणार; शिक्षण विभागाचा निर्णय

येथे क्लिक करा