Vijaykumar Dudhale
अमृता रानडे-फडणवीस यांचा जन्म ९ एप्रिल १९७९ रोजी नागपूरमध्ये झाला. त्यांचे आई-वडील डॉक्टर आहेत
अमृता फडणवीस यांनी नागपूरमधील जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स ॲंड इकोनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एमबीएचे (वित्त) शिक्षण घेतले. पुण्यातील सिंबॉयसिसमधून त्यांनी कायदाची पदवी घेतली.
अमृत फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेत 2003 रोजी कार्यकारी कॅशिअर म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्या नागपूरमध्ये बँकेच्या शाखाधिकारी झाल्या.
अमृता फडणवीस यांचा डिसेंबर 2005 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी विवाह झाला.
ॲक्सिस बँकेत कार्यकारी कॅशिअर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अमृता फडणवीस सध्या बँकेच्या उपाध्यक्षपदापर्यंत पोचल्या आहेत. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी बँकेत नोकरी करण्याला पसंती दिली आहे.
अमृता फडणवीस बँकर असल्या तरी शास्त्रीय संगीताची त्यांना उत्तम जाण आहे. प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’मध्ये त्यांनी एक गाणं गायलं आहे. याशिवाय काही अल्बममध्येही त्यांनी गाणी गायली आहेत.
अमृता फडणवीस राजकारणावरही बेधडक भाष्य करत असतात. त्यांची स्वतःची राजकीय मतं आहेत, त्यानुसार त्या व्यक्त होत असतात.
मुंबईतील ट्रॅफिक, उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात केलेली विधाने राज्यात चांगलीच गाजली होती.