बारामतीत काँग्रेसने उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? वडील होते आमदार, शरद पवारांना दिलं होतं आव्हान

Jagdish Patil

आकाश मोरे

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने ॲड. आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Akash More Congress Candidate | Sarkarnama

मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या सूचनेनंतर सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल ही उमेदवारी जाहीर केली.

Mallikarjun Kharge | Sarkarnama

हर्षवर्धन सपकाळ

महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना सुनेत्रा पवार यांनी फोन करुन पाठिंबा देण्याची विनंती केली होती.

Harshvardhan Sapkal | Sarkarnama

काँग्रेस

तरीही काँग्रेसने आकाश मोरेंना उमेदवारी दिली. याच निमित्ताने मोरे यांची पार्श्वभूमी जाणून घेऊया.

Akash More, Harshvardhan Sapkal | Sarkarnama

कार्यकर्ते

आकाश मोरे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून ते व्यवसायाने वकील आहेत.

Akash More Congress Candidate | Sarkarnama

मुलाखती

बारामती विधानसभेसाठी पाच इच्छुकांच्या मुलाखती काँग्रेस नेतृत्वाने घेतल्या होत्या त्यापैकी आकाश मोरेंच्या नावाला पसंती देण्यात आली.

Akash More Congress Candidate | Sarkarnama

वडील

आकाश मोरेंचे वडील ॲड.विजयराव मोरे हे विधान परिषदेवर आमदार होते.

Vijayrao More | Sarkarnama

शरद पवार

विजयराव मोरे यांनी जेष्ठ नेते शरद पवारांच्या विरोधात देखील विधानसभेची निवडणूक लढवली होती.

Sharad Pawar | Sarkarnama

निष्ठावान

काँग्रेस पक्षासोबत ते सुरुवातीपासून निष्ठावान असल्यामुळे त्यांचा विचार काँग्रेस पक्षाने विधानसभेचे उमेदवार म्हणून केला आहे.

Akash More Congress Candidate | Sarkarnama

NEXT : गॅस टंचाईमुळे जो तो म्हणतोय LPG पेक्षा PNG बरा! पण कनेक्शन घ्यायचं कसं?

PNG Gas Connection Process | Sarkarnama
क्लिक करा