Aslam Shanedivan
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि बारामती जिल्ह्यातील पुणे या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.
तर ही पोटनिवडणूक राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लढविणार असल्याने ती बिनविरोध होईल अशी शक्यता होती.
मात्र आता ही शक्यता मावळली असून ही निवडणूक लढवण्याची तयारी काँग्रेस पक्षासह ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
पहिल्याच दिवशी तीन जणांनी अर्ज दाखल केले असून ते इतर जिल्ह्यातील आहेत. तर सांगलीच्या जत तालुक्यातील सतीश कृष्णा कदम हे हिंदुस्तान जनता पार्टीचे उमेदवार आहेत.
तर दुसरा अर्ज हा सातारा येथील सागर शरद भिसे यांचा असून त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
तर तिसरा उमेदवार हा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील राघू घुटुकडे हे असून त्यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टी पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे.
Amrit Scheme : एमपीएससी गट-ब परीक्षेच्या तयारीसाठी सरकार देणार पैसे, असा करा अर्ज