Roshan More
एमपीएससी गट-ब परीक्षेची तयारी अनेक विद्यार्थी करतात. यामधून एसटीआय, एएसओ तसेच दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक अशा पदांवर नियुक्ती होते.
सरकारच्या 'अमृत' योजनेअंतर्गत गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना (सन २०२५-२६) राबविण्यात येत आहे.
सन २०२५-२६ मधील गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
इच्छुकांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. अर्ज भरण्यापूर्वी सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी रु. १०,००० तर मुलाखतीच्या तयारीसाठी रु. ५,००० इतके अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
योजनेविषयीची सर्व माहिती अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ एप्रिल २०२६ आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन अमृतचे व्यवपकीय संचालक यांनी केले आहे.