Amol Sutar
माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजप प्रवेश केल्यामुळे बसवराज पाटील यांच्या काँग्रेस सोडण्यामागे चव्हाण यांचाच हात असल्याचे बोलले जात आहे.
करमाळा येथील बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनीही बसवराज पाटील यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश केला.
रश्मी बागल यांच्या भाजप प्रवेशाबाबत या अगोदरच मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी जाहीर केले होते.
बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व दिग्विजय बागल यांचे वडील दिवंगत दिगंबरराव बागल यांनी 1995 व 1999 असे दोन वेळा करमाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले व ते राज्यमंत्री देखील होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.