Rashmi Mane
मराठा आरक्षणावरून वातावरण तापत आहे.
मनोज जरांगे पाटलांनी गेल्या सहा-सात महिन्यात जे आंदोलन छेडले आहे. त्यावर राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे-पाटील यांच्यावरून गदारोळ झाला.
आशिष शेलार यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या वक्तव्यावरून एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश सरकारला दिले आहे.
आता मनोज जरांगे पाटलांची SIT चौकशी करण्यात येणार आहे.
एसआयटी म्हणजे विशेष तपास पथक (Special Investigation Team).
वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, गुन्हे घडल्यास त्यांचा सखोल तपास करणे, आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणे, हे काम विशेष तपास पथक करत असते.
गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष तपास पथकांना नेमले जाते. सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारला एखाद्या प्रकरणात अधिकाऱ्यांना निर्देश देण्याचा अधिकार असतो अशा वेळी विशेष पथक नेमले जाते.
एसआईटी एका विशिष्ट वेळेत तपास करते. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केला जातो.