Deepak Kulkarni
नेहा ब्याडवाल या एक आयएएस अधिकारी असून त्यांचा जन्म राजस्थानच्या जयपूर येथे झाला.
अभ्यासात हुशार असलेल्या नेहाचं शालेय शिक्षण राजस्थानमधील जयपूर,छत्तीसगडमधील बिलासपूर,तसेच भोपाळमध्ये झालं.
वडिलांकडून प्रेरणा घेत युनिव्हर्सिटीत टॉपर राहिलेल्या नेहानं प्रशासकीय सेवेतच करिअर करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या तीन प्रयत्नांत तिला अपयश आलं. मग तिनं सोशल मीडिया,मोबाईल आणि मित्रमंडळींपासून तीन वर्ष दूर राहण्याचा निर्णय घेतला अन् तो पूर्णही केला.
अखेर 2021 मध्ये नेहानं प्रचंड कष्ट, जिद्दीच्या जोरावर चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा 539 व्या ऑल इंडिया रँकसह (AIR) उत्तीर्ण केली.
नेहानं 24 व्या वर्षी आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. तिचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी असाच आहे.
तिला यूपीएससीची तयारी सुरू असताना अनेकदा एसएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली. पण तरीही तिनं नोकरी स्विकारली नाही.
नेहा ब्याडवाल राजस्थानातील गुलाबी शहर असलेल्या जयपूर जिल्ह्यातील जामवारामगड तहसीलची हे त्यांचं जन्मगाव आहे.
नेहाच कुटुंब नोकरदार आहे. तिचे वडील प्रल्हाद ब्याडवाल हे PHED मध्ये वरिष्ठ लेखापाल विभागीय अधिकारी आहेत व आई रजनी देवी गृहिणी आहेत.