सरकारनामा ब्यूरो
2022 च्या बॅचच्या IPS अधिकारी अनू बेनिवाल या मुळच्या दिल्लीच्या आहेत.
अनू बेनिवाल यांनी 2018 मध्ये UPSC परीक्षेसाठी पहिला प्रयत्न केला होता.
2019 मध्ये त्या अपयशी झाल्या आणि 2020 मध्ये पुन्हा प्रयत्न केल्यानंतर त्यांना 638 वा क्रमांक मिळाला होता.
मिळालेल्या रँकवर त्या समाधानी नव्हत्या. वर्ष 2021 मध्ये त्या 217 व्या क्रमांकासह उत्तीर्ण झाल्या.
त्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी दिल्ली विद्यापीठातील हिंदू महाविद्यालयात शिक्षण घेतले.
IPS अनू यांनी भौतिकशास्त्रात B.Sc आणि M.Sc केले आहे.
त्यांनी नॅनो सायन्समध्येही संशोधन केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर यूपीएससी परीक्षा देण्यास सुरुवात केली.
'ब्युटी विथ ब्रेन' अधिकारी अनु या सोशल मीडियावर सक्रिय असतात.
त्यांनी UPSC ची तयारी करत असताना भूगोल हा ऐच्छिक विषय ठेवला होता.