Arun Jaitley: विद्यार्थी नेते ते अर्थमंत्री, अरुण जेटलींचा राजकीय प्रवास...

सरकारनामा ब्यूरो

तेजस्वी नेता

भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली हे लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. शालेय जीवनात त्यांना अनेक शैक्षणिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

Arun Jaitley | Sarkarnama

शिक्षण

नवी दिल्लीच्या सेंट झेवियर्स स्कूल येथून सुरुवातीचे शिक्षण घेऊन, श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉम केले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली.

Arun Jaitley | Sarkarnama

उत्तम मार्गदर्शक

राजकीय अनुभवाचा उपयोग करून त्यांनी पक्षासाठी आणि केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती.

Arun Jaitley | Sarkarnama

कायदेशीर भूमिका

कठीण काळात पक्ष आणि सरकारला कायदेशीर गुंतागुंतीतून बाहेर काढण्यातही त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली.

Arun Jaitley | Sarkarnama

अर्थमंत्री अन् खासदार

उत्तर प्रदेश राज्यसभेचे चारवेळा खासदार म्हणून निवडून आलेले जेटली यांनी अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारीही उत्तमरित्या पार पाडली.

Arun Jaitley | Sarkarnama

आवडते राजकारणी

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या दोघांच्या आवडत्या राजकारण्यांपैकी असलेले अरुण जेटली हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याही जवळचे होते.

Arun Jaitley | Sarkarnama

आंदोलनात सक्रिय

आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी सरकारविरोधातील आंदोलनात जेटलींनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यावेळी ते भारतीय जनता युवा मोर्चाचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.

Arun Jaitley | Sarkarnama

राजकीय कारकीर्द

1974 मध्ये डीयूच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष असलेले अरुण जेटली यांची दिल्ली विद्यापीठातून राजकीय कारकीर्द सुरू झाली होती.

Arun Jaitley | Sarkarnama

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते

राजकारणाची उत्तम जाण असल्याने त्यांना 1999 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते करण्यात आले होते.

Arun Jaitley | Sarkarnama

Next : बाॅलिवूड गाजवलेल्या माधुरी दीक्षितचं ठरलं, लोकसभा निवडणूक लढणार नाही; पण...

येथे क्लिक करा