Jagdish Patil
आशना चौधरी हे 'ब्युटी विथ ब्रेन'चे एक चांगलं उदाहरण आहेत. त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC क्रॅक केली.
त्यांनी 2020 आणि 2021 मध्ये UPSC परीक्षेला दिली होती. दोन्ही वेळा त्यांना अपयशाचा सामना करावा लागला.
दोनदा अपयश आल्यानंतरही निराश न होता त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. यावेळी कुटुंबियांनीही त्यांना साथ देत प्रोत्साहन दिलं.
त्यानंतर 2022 मध्ये मात्र आशना यांनी UPSC मध्ये यश मिळवलं. संपूर्ण भारतात 116 वी रँक मिळवत त्यांनी UPSC क्रॅक केली.
मात्र, चांगली रँक मिळूनही त्यांनी IAS न होता IPS होण्याला पसंती दिली. गुन्हेगारांना धडकी भरवणाऱ्या IPS अशी त्यांची ओळख आहे.
आशना या यूपीतील हापूर जिल्ह्यातील पिलखुवा शहरातील आहेत. त्यांचे वडील सरकारी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. तर आई गृहिणी आहे.
त्यांना 12 वीत 96.5% गुण मिळाले होते. त्यांनी शालेय शिक्षण सेंट झेवियर्स, उदयपूरमधील सेंट मेरीआणि गाझियाबादमधील दिल्ली पब्लिक स्कूलमधून पूर्ण केलं आहे.
त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी मिळवली. यानंतर दक्षिण आशियाई विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांचे शिक्षण घेताना त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली.
त्यांचा हा प्रवास UPSC ची तयारी करणाऱ्यांना प्रेरणा देतो. सध्या त्यांची नियुक्ती गोरखपूरमध्ये करण्यात आली आहे.