Jagdish Patil
इयत्ता सहावीच्या वर्गात नापास झाल्यानंतर खचून न जाता पुढे शिक्षण घेत रुक्मिणी रेयर यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक केली.
नापास झालं तरी खचून न जाता जिद्दीने प्रयत्न केल्यास यश मिळू शकतं याचं उदाहरणं त्यांनी निर्माण केलं आहे.
रुक्मिणी यांचं सुरुवातीचं शिक्षण गुरुदासपूरमध्ये झालं. अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठातून त्यांनी सामाजिक शास्त्र या विषयात डिग्री घेतली.
त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट मध्ये मास्टर डिग्री मिळवली. त्यानंतर म्हैसुरच्या आशोधा मुंबईतील अन्नपूर्णा महिला मंडळ येथे इंटर्नशिप केली.
एनजीओमध्ये असतानाच UPSC देण्याचा निर्णय घेतला आणि 2011 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी संपूर्ण भारतात UPSC त दुसरी रँक मिळवली.
उल्लेखनीय बाब म्हणजे कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय त्यांनी हे यश मिळवलं.
यासाठी त्यांनी NCERT ची पुस्तके, नियमित वर्तमानपत्र-मासिकांचे वाचन केलं. त्यांचा हा यशस्वी प्रवास आता अनेकांना प्रेरणा देत आहे.