D Gukesh : वाह रे पठ्ठ्या! अवघ्या 18 व्या वर्षी बनला बुद्धीबळ विश्वविजेता; वाचा डी. गुकेशची यशोगाथा

Jagdish Patil

डी गुकेश

चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून डी गुकेशने अठराव्या वर्षी 18 वा बुद्धीबळ विश्वविजेता होण्याचा मान मिळवला आहे.

D Gukesh | Sarkarnama

विश्वविजेता

बुद्धिबळाच्या इतिहासात सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता होत आपलं नाव सुवर्ण अक्षरांत लिहिणारा डी गुकेश कोण आहे? ते जाणून घेऊया.

D Gukesh | Sarkarnama

चेन्नई

डी. गुकेशचं पूर्ण नाव गुकेश दोम्मराजू असं असून त्याचा जन्म 29 मे 2006 मध्ये चेन्नईत झाला.

D Gukesh | Sarkarnama

आई-वडील

त्याचे वडील रजनीकांत हे कान, नाक, घश्याचे सर्जन आहेत. तर आई पद्मा या माइक्रोबायोलॉजिस्ट आहेत.

Gukesh Dommaraju | Sarkarnama

छंद

गुकेशने वयाच्या सातव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरूवात केली. आपला छंद जोपासण्यासाठी त्याने नियमित शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला.

D Gukesh | Sarkarnama

लक्ष केंद्रीत

चौथीनंतर त्याने नियमित शाळेत जाणे बंद करत संपूर्ण लक्ष बुद्धिबळवर केंद्रीत केलं होतं.

D Gukesh | Sarkarnama

विजयी घौडदौड

त्याने 2015 मध्ये आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा तर 2018 मध्ये 12 वर्षांखालील जागतिक युवा स्पर्धा जिंकली.

D Gukesh | Sarkarnama

ग्रँडमास्टर

2019 पर्यंत तो जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता. भारताचाही सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहे.

D Gukesh | Sarkarnama

NEXT : वडील, बहीण, पती IAS अधिकारी; अन् 'ती' ही बनली IRS

IRS Abhishri | Sarkarnama
क्लिक करा