Pradeep Pendhare
भीमसिंह महाराजांच्या मृत्यूनंतर भगवानगडावरील गादीचे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी भगवानगडाची जबाबदारी सांभाळली.
मुंबईतील कांदिवली इथल्या श्रीगुरू श्री 1008 स्वामी काशिकानन्दगिरीजी महाराज द्वादशदर्शनाचार्य आंनदवन आश्रमात 'न्यायशास्त्रा'च शिक्षण घेतलं.
गुरुकुलपद्धतीनं 9 वर्षे शिक्षण घेऊन वाराणसी विद्यापिठाची 'न्यायाचार्य' ही पदवी संपादन केली.
पुणे विद्यापीठातून एम.ए (मराठी) करून 'वारकरी संतांची कुटरचना' या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून पी. एचडी संपादन केली.
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम असलेल्या नामदेवशास्त्रींनी पंकजा मुंडेंना भगवान गडावर दसऱ्याच्या राजकीय मेळाव्यांना बंदी घातली.
नामदेवशास्त्री महाराजांनी 11 ऑक्टोबर 2016 रोजी राजकीय व अन्य मेळाव्याला परवानगी देण्यात येऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली.
मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडाची निर्मिती 12 डिसेंबर 2015 करत भगवान गडावर राजकीय वा दसरा मेळावा घेणं बंद केलं.
राजकीय भाष्य करण्यासाठी भगवान गड नाही, असे नामदेवशास्त्री महारांनी म्हटलेले असताना, त्यांनी मात्र मंत्री धनंजय मुंडेंची त्याच गडावरून पाठराखण केली.