Rashmi Mane
संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागले आहे. अर्थसंकल्पाची प्रत सादर करण्याच्या सरकारच्या शैलीत गेल्या काही वर्षांत बराच बदल झाला आहे.
2019 मध्ये जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. तेव्हा त्यांनी अर्थसंकल्प ब्रीफकेसच्या जागी 'बही-खात्यात' ठेवून देशाचे लक्ष वेधून घेतले.
गेल्या काही वर्षांत केंद्रीय अर्थसंकल्पाचा 'ब्रीफकेस' ते 'बही- खाता' आणि नंतर डिजिटली टॅबलेटपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.
2018 पर्यंत देशात अर्थमंत्री ब्रीफकेसमध्ये अर्थसंकल्पाची प्रत घेऊन संसदेत पोहोचायचे.
त्यानंतर, 1970 च्या सुमारास, त्याची जागा हार्डबाउंड बॅगने घेतली, ज्याचा रंग वेळोवेळी बदलत गेला.
मात्र, 2019 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही परंपरा बदलली. बजेटची प्रत पारंपारिकपणे वापरल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळलेली होती.
2021 मध्ये अर्थसंकल्प नव्या स्वरूपात सादर करण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या 'डिजिटल इंडिया' मोहिमेला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी टॅबलेट द्वारे अर्थसंकल्प सादर केला.
आत्मनिर्भर भारताचा संदेश देण्यासाठी सरकारने 'मेड इन इंडिया टॅब्लेट' सह अर्थसंकल्प सादर केल्याचे सांगण्यात आले होते.