Baban Gitte : सरपंचावर गोळीबार केल्यानंतर चर्चेत आलेले बबन गित्ते कोण आहेत?

Akshay Sabale

Baban Gitteगित्तेंवर गुन्हा दाखल -

परळीतील मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळेंचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. याप्रकरणी राष्ट्रवादीचे ( शरद पवार ) नेते, बबन गित्तेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Baban Gitte | sarkarnama

जनक्रांती सेना -

बबन गित्ते हे जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी जनक्रांती सेनेच्या माध्यमातून मोठं संघटन उभे केलं.

Baban Gitte | sarkarnama

पंकजा अन् धनंजय मुंडेंना साथ -

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यात बबन गित्ते वाढले आहेत. त्यांच्या पश्ताच गित्तेंनी अनुक्रम पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना साथ दिली.

Baban Gitte | sarkarnama

पत्नी सभापती -

पंकजा मुंडेंशी मदभेद झाल्यानंतर ते धनंजय मुंडेंच्या सोबतीला गेले. त्यांच्या संगतीनं परळी पंचायत समिती निवडणूक लढवली. त्यात गित्तेंच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या.

Baban Gitte | sarkarnama

मुंडे गटाबरोबर वाद -

धनंजय मुंडेंच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमतानं अविश्वास ठराव आणला गेला. तिथे धनंजय मुंडे आणि गित्तेंच्यात वादाची पहिली ठिणगी पडली.

Baban Gitte | sarkarnama

जेलवारी -

एका प्रकरणात गित्तेंना जेलवारी करावी लागली. प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवायच्या इराद्यानं गित्तेंनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Baban Gitte | sarkarnama

प्रदेश उपाध्यक्ष -

गित्तेंची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात गित्तेंना ताकद दिल्याचं स्पष्ट झालं.

Baban Gitte | sarkarnama

NEXT : नक्षलग्रस्त भागातील 'लेडी सिंघम'

IPS Ankita Sharma | Sarkarnama