Ganesh Sonawane
साताऱ्यातील फलटण शहरात एका महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेला आता धक्कादायक वळण मिळालं आहे.
मृत डॉक्टर महिलेच्या हातावर पीएसआय गोपाल बदनेचं नाव आहे.
गोपाल बदने फलटणमध्ये पीएसआयपदी कार्यरत होता. तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचा आहे.
PSI गोपाल बदनेनं ४ वेळा बलात्कार केल्याचं आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेने हातावर लिहलं आहे.
प्रशांत बनकर याने देखील मागचे ५ महिने माझा शाररिक व मानसिक छळ केला असं लिंहलं आहे. प्रशांत बनकर हा मृत महिला डॉक्टर राहत होत्या त्या घराचा घरमालक आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आता गोपाल बदने यास निलंबित करण्यात आलं आहे.
गोपाल बदने हा फरार असून त्याच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत.