Roshan More
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांना सात मुली आणि दोन मुलं आहेत.
लालू प्रसाद यादव यांची सर्वात मोठी मुलगी मीसा भारती या राजकारणात सक्रीय आहेत. तर, दुसरी मुलगी रोहिणी आचार्य या देखील काही काळ राजकारणात होत्या. त्या सिंगापूरमध्ये सेटल आहेत.
लालु यांची तिसरी मुलगी चंदा यादव यांचे 2006 मध्ये लग्न झाले. त्या इंडियन एयरलाइन्समध्ये कामाला देखील होत्या.
चौथी मुलगी रागिणी यादव यांचे 2012 मध्ये लग्न राहुल यादव यांच्यासोबत झाले. ते समाजवादी पार्टीचे नेते आहेत.
पाचवी मुलगी हेमा यांचे दिल्लीमधील विनिय यादव यांच्याशी लग्न झाले आहे. विनित यांचे वडील हे दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होते.
सहावी मुलगी अनुष्का यादव हिचे हरियाणा सरकारमध्ये मंत्री राहिलेले अजय सिंह यादव यांचा मुलगा चिरंजीवी यांच्यासोबत लग्न झाले. चिरंजीवी ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत.
राजलक्ष्मी यादव यांचा विवाह मुलायम सिंह यांच्या नातू तेज प्रताप सिंह यांच्यासोबत झाला. ते माजी खासदार आहेत.
तेजप्रताप हे राजकारणात सक्रीय असून ते बिहारची विधानसभा निवडणूक लढत आहेत. त्यांची राजदमधून हाकालपट्टी करण्यात आली आहे.
तेजस्वी यादव हे राजदचे प्रमुख आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत ते मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत.