सरकारनामा ब्यूरो
बीडमधील परळीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या खास उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
शासन आपल्या दारी कार्यक्रमादरम्यान दीड हजार कोटींच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
लोकप्रिय नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री यांनी गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून नमस्कार केला.
परळी वैद्यनाथ मंदिरात जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले. यावेळी पंकजा मुंडे, धनंजय मुडेंही होते.
वैद्यनाथाची पूजा
यावेळी उपस्थित सर्व मंत्र्यांच्या हस्ते वैद्यनाथाची पूजा करण्यात आली.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे परळीत ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.