MP Rajani Patil: दिल्लीच्या राजकारणातील तडफदार मराठमोळं नेतृत्व रजनी पाटील...

सरकारनामा ब्यूरो

रजनी पाटील

मराठमोळ्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील या मूळच्या सांगली येथील बहिरवड गावच्या आहेत.

MP Rajani Patil | Sarkarnama

वडील स्वातंत्र्य सैनिक

स्वातंत्र्यसेनानी आत्माराम पाटील यांच्या त्या कन्या आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री अशोक पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.

MP Rajani Patil | Sarkarnama

राजकीय प्रवास

विद्यार्थीदशेत त्या काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. त्यावेळी त्यांनी पुणे विद्यापीठ सिनेट निवडणूक जिंकली होती.

MP Rajani Patil | Sarkarnama

सोनिया गांधींच्या विश्वासू

काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडच्या त्या निकटवर्तीय आहेत. सोनिया गांधींच्या विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे.

MP Rajani Patil | Sarkarnama

तडफदार खासदार

दिल्लीच्या राजकारणातील तडफदार मराठमोळ्या रजनी पाटील या राज्यसभा खासदार आहेत.

MP Rajani Patil | Sarkarnama

काँग्रेस - भाजप - काँग्रेस प्रवेश

भाजपमधून बीड जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

MP Rajani Patil | Sarkarnama

विविध पदांवर केले काम

त्यांनी खादी ग्रामोद्योग बोर्डाचे जिल्हाध्यक्ष पद, केंद्रीय समाजकल्याण बोर्डाचे अध्यक्षपद, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष, राज्य सहकारी बँकेचे संचालकपद त्यांनी भूषवले आहे.

MP Rajani Patil | Sarkarnama

उत्कृष्ट संसदपटू

रजनी पाटील यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला आहे.

MP Rajani Patil | Sarkarnama

Next : मध्य प्रदेशात भाजप जिंकली पण शिवराज सिंह यांचे 'हे' मंत्री झाले पराभूत!

येथे क्लिक करा