सरकारनामा ब्यूरो
मोदी सरकारच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिला अर्थसंकल्प उद्या संसदेत सादर केला जाणार आहे. तर याचं पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे अर्थसंकल्प विकासाच्या दृष्टीने कसे असेल हे सांगितले.
मोदी म्हणाले, देशातील 140 कोटी नागरिकांच्या विकासासाठी हा महत्त्वाचा अर्थसंकल्प असणार आहे.
तिसऱ्या अर्थसंकल्पाची जबाबदारी मोदी सरकारवर सोपवण्यात आली असून हा अर्थसंकल्प 2047 मध्ये किती महत्त्वाचा ठरेल याकडे सरकारचे लक्ष असेल. सरकार सध्या मिशन मोडवर आहे.
2025 च्या या अर्थसंकल्पात येणाऱ्या वर्षात महिलांसाठी काही खास आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष दिले जाणार आहे. या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणावर भर देण्याचे ध्येय या सरकारचे आहे.
स्त्रियांना सन्मान आणि समान हक्क मिळणे हे महत्त्वाचे आहे. तसेच महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय या अर्थसंकल्पात घेतले जाणार आहेत.
मोदी म्हणाले, भारताचा अर्थिक विकास तरुण पिढीवर अवलंबून आहे. यामुळे तरुणांनी विकास कामात जास्तीत जास्त सहभाग घेणे आवश्यक आहे.
सध्याची तरूण पिढी जेव्हा 45 वर्षाची होईल तेव्हा निश्चितच भारत विकसित झालेला असेल.
2025 चा अर्थसंकल्प ऐतिहासिक आणि भारताला नवी ऊर्जा देणारा असणार आहे. देशाला विकासाच्या दृष्टीने मजबूत करणारे कायदे उद्याच्या अर्थसंकल्पात मांडले जाणार असल्याचं मोदी म्हणाले.
2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे हाच ध्येय मोदी सरकारचा असणार आहे.