सरकारनामा ब्यूरो
गेल्या अनेक महिन्यांपासून कॅनडात सुरू असलेल्या राजकीय संकटांमुळे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधानपदाचा आणि लिबरल पक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
कॅनडात निवडणुकीची तयारी सुरू झाली आसून पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाचे चंद्र आर्य यांच्यानंतर आणखी एक भारतीय चेहरा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरला आहे.
कॅनडाच्या माजी खासदार असलेल्या रुबी धल्ला ज्यांनी सत्ताधारी लिबरल पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
बुधवारी उमेदवारी जाहीर करण्याच्या शेवटच्या क्षणाला त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
रुबी ढल्ला यांचा जन्म विनिपेगच्या मॅनिटोबा येथे झाला. त्यांचे आई वडील हे मुळचे पंजाबचे होते पण त्यांनी कॅनडामध्ये स्थलांतर केले.
इंदिरा गांधीना पत्र
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार,त्यांनी वयाच्या 10 व्या वर्षी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पत्र लिहिले होते यांमुळे त्या खूप चर्चेत आल्या होत्या.त्यावेळी त्या लिबरल पक्षाचा एक भाग आणि सुरुवातीच्या दिवसात मॉडेल म्हणून करियरला सुरुवात केली.
रुबी धल्ला पहिल्यांदा 2004 ला ब्रॉम्प्टन स्प्रिंगडेलच्या जागेवरून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून येत राजकीय करियरला सुरुवात केली . तर 2004 ला कंझर्व्हेटिव्ह नीना ग्रेवाल यांच्यासह संसदेत निवडून आलेल्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या.
धल्ला यांनी 2006, 2008 मध्येही या जागेवर विजय मिळवला. पण 2011ला त्यांना पराभवा़चा सामना करावा लागला. यामुळे त्यांनी2015 ला राजकारणातून ब्रेक घेतला.
रुबी यांनी फक्त राजकारणातचं नाही तर मॉडेलिंग क्षेत्रातही त्यांनी काम केले. सध्या त्या त्यांचा हॉटेल बिजनेस सांभळत आहेत.
1 फेब्रुवारीलाचं अर्थसंकल्प का सादर केला जातो? काय आहे कारण...