Satish Jarkiholi : बेळगावच्या राजकारणातले 'बिग बॉस'; कर्नाटकच्या CM पदाच्या शर्यतीत आलेले सतीश जारकीहोळी कोण आहेत?

Deepak Kulkarni

कर्नाटकात राजकीय भूकंप

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांचा मुलगा, यतींद्र सिद्धारमय्या यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Yathindra Siddaramaiah | Sarkarnama

मुख्यमंत्रिपदासाठी योग्य व्यक्ती

यतींद्र यांनी आपले वडील सिद्धारमय्या हे त्यांच्या राजकीय जीवनाच्या अंतिम टप्प्यात असून कर्नाटकला आता प्रगतिशील विचारांच्या मुख्यमंत्र्यांची गरज असल्याचं विधानही त्यांनी केलं. सतीश जारकीहोळी हे मुख्यमंत्रिपदासाठी योग्य व्यक्ती असल्याचंही ते म्हणाले.

Siddaramaiah | Sarkarnama

पुन्हा मुख्यमंत्री बदलाची चर्चा

कर्नाटकात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाची चर्चा जोर धरू लागली आहे. यात जारकीहोळी यांचं नाव आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.

Satish Jarkiholi | Sarkarnama

बेळगावचे पालकमंत्री

जारकीहोळी सध्या सिध्दारमय्या यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत. तसेच ते बेळगावचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Satish Jarkiholi | Sarkarnama

'सावकार' म्हणून ओळख

जारकीहोळी यांची बेळगावच्या राजकारणात 'सावकार' म्हणून ओळख आहे.

Satish Jarkiholi | Sarkarnama

एकाच घरात चार आमदार, एक खासदार

बेळगावच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ असलेल्या जारकीहोळी यांचे सख्खे चार भाऊ वेगवेगळ्या पक्षातून आमदार आहेत.

Satish Jarkiholi | Sarkarnama

कन्या प्रियंका खासदार

सतीश जारकीहोळी यांचा एक भाऊ विधान परिषदेवर तर तीन विधानसभेत आमदार आहेत, त्यांची 28 वर्षांची कन्या प्रियंका खासदार आहेत. त्या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या आहेत.

Satish Jarkiholi | Sarkarnama

सिद्धारमय्या यांचे अत्यंत विश्वासू

मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून सतीश जारकीहोळी हे ओळखले जातात.

Satish Jarkiholi | Sarkarnama

डी के शिवकुमार यांच्याशी वितुष्ट

काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार यांच्याशी जारकीहोळी यांचे तितकेसे राजकीय सूर जुळले नसल्याचे नेहमीच दिसून आलं आहे.

Satish Jarkiholi | Sarkarnama

NEXT: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बंधणकारक केलेल्या APAAR ID कार्डचा फायदे काय? जाणून घ्या थोडक्यात...

APAAR ID | Sarkarnama
येथे क्लिक करा...