Rashmi Mane
मुख्यमंत्रिपदावर विराजमान होण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ असते. मात्र, परिस्थितीमुळे त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागते. कथित भूखंड घोटाळाप्रकरणी अटक झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
मात्र, हेमंत सोरेन जेलमधून बाहेर येताच चंपई सोरेन यांना राजीनामा द्यावा लागला. हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा या पदाची शपथ घेतली. जयललिता यांनीची या खुर्चीवर बसवलं होते.
जयललिता यांना कोर्टाने शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांनी ओ पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसवले.
जयललिता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ओ पनीरसेल्वम यांनी राजीनामा देण्यास सांगितले.
चारा घोटाळ्यामध्ये तुरुंगात जावे लागल्याने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्री बनवलं होतं.
राबडीदेवी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या. त्या जवळपास 1 वर्ष 201 दिवस मुख्यमंत्री होत्या.
बिहारचे मुख्यमत्री नितीश कुमार यांनी एकदा जीतन राम मांझी यांच्यावर विश्वास दाखवला होता. मे 2014 ते फेब्रुवारी 2015 या कालावधीत ते मुख्यमंत्री होते.
नितीश यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पण फेब्रुवारी 2015 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर मांझी यांनी पक्ष सोडला.