Jagdish Patil
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी ओडिशातील पुरी बीचवर फेरफटका मारला.
कडेकोट बंदोबस्तात त्यांनी सोमवारी सकाळी पुरी बीचवर फेरफटका मारला.
याबाबतचे फोट राष्ट्रपतींच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आले आहेत.
फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं की, अशी ठिकाणे आपल्याला जीवनाच्या ध्येयाजवळ आणतात आणि आपल्याला आठवण करून देतात की आपण निसर्गाचा एक भाग आहोत.
"पर्वत, जंगलं, नद्या आणि समुद्रकिनारा आपल्याला आकर्षित करतात."
मंद वाऱ्याची झुळूक, लाटांच्या गर्जना आणि अथांग पाणी, हा एक ध्यानपूर्ण अनुभव होता, असंही त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उदयगिरी लेण्यांना देखील भेट दिली. या भेटीचे फोटो त्यांनी एक्सवर पोस्ट केले आहेत.
भुवनेश्वर, ओडिशातील उदयगिरी टेकडीवर जैन लेण्यांचा समूह आहे. या लेणी भारतीय स्थापत्य शास्त्राचा दुर्मिळ नमुना असल्याचंही राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.