सरकारनामा ब्यूरो
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार (7 एप्रिल) दक्षिण विभाग सायबर पोलिस ठाण्यातील 'निर्भया सायबर लॅब'चे उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीसांंबरोबर राज्यमंत्री योगेश कदम आणि सायबर विभागातील पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'निर्भया सायबर लॅब' येथील स्टाफ रुम, कॉन्फरन्स रुम, अधिकारी कक्ष यांची पाहणी केली.
कक्षाची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी सायबर लॅबची पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
सायबर लॅबच्या स्थापनेमुळे शहरातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होणार आहे. आणि जनतेची होणारी फसवणूक, नुकसान आणि मुख्यत: महिलांच्या सुरक्षिततेकडे एक महत्वाचे पाऊल असणार आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रात सुरू केलेले सायबर लॅब, ज्याला आता पोलिस ठाण्याचा दर्जा प्राप्त होत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईच्या पार्श्वभूमीवर लवकरच पुण्यातही सायबर लॅब सुरू होणार असल्याचे पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.